Share

PAK vs WI 2022 : बाबर आझमच्या शतकीय खेळीने वेस्ट इंडीज गारद; वाचा सविस्तर…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारी मुलतानमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने ५ गडी राखून सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडीज संघाने ५० षटकात ८ विकेट गमावत ३०५ धावा केल्या आणि पाकिस्तानला विजयासाठी ३०६ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ४९.२ षटकांत ५ गडी गमावून ३०६ धावा करून सामना जिंकला.

पाकिस्तानच्या विजयात कर्णधार बाबर आझमचे शतक, तर मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हकच्या अर्धशतकी खेळीने मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात बाबर आझमने १०९ चेंडूंचा सामना करत ९ चौकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी केली. तर सलामीवीर इमामच्या बॅटमधून ७१ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ६५ धावा आल्या. मोहम्मद रिझवानने १ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या, तर खुशदिल शाहने २३ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकारासह ४१ धावा केल्या. फखर जमानने ११ धावा, तर शादाब खानने ६ धावांची खेळी खेळली. शेवटी मोहम्मद नवाज ८ धावांवर नाबाद राहिला.

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा सलामीवीर शाई होपने चांगली खेळी खेळली. त्याने १३४ चेंडूंत १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १२७ धावा केल्या. त्याचवेळी शामराह ब्रूक्सनेही ८३ चेंडूत ७० धावा करत ७ चौकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या ३०५ पर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार पूरनने २१ धावांचे योगदान दिले तर रोमवेन पॉवेलने ३२ धावा केल्या. रोमारियो शेफर्डने २५ धावांची खेळी खेळली. पाकिस्तान कडून गोलंदाजी करताना हॅरिस रौफने सर्वात यशस्वी गोलंदाजी करत १० षटकात ७७ धावा देत ४ बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!