मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आज खेळवला जाणार आहे. टी-२० क्रिकेटमधील दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाचे पारडे थोडे जड दिसते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी-२० सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारतीय संघाने ९ सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने केवळ ६ सामने जिंकले आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका शेवटच्या ५ सामन्यात
मागील खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ बरोबरीच्या मार्गावर आहेत. गेल्या ५ सामन्यात दोन्ही संघांनी २-२ असा विजय मिळवला तर एक सामना रद्द झाला आहे. या दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना बेंगळुरू येथे खेळला गेला होता जिथे दक्षिण आफ्रिकेने एकतर्फी सामन्यात भारतीय संघाचा ९ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात भारताकडून सर्वोच्च धावसंख्या शिखर धवनच्या नावावर होती, जो या मालिकेचा भाग नाही. त्याने या सामन्यात सर्वाधिक ३६ धावांची खेळी खेळली होती. दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात क्विंटन डी कॉकने नाबाद ७९ धावांची खेळी केली होती.
भारतात टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेच्या भारतातील विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर भारताविरुद्ध संघाने वर्चस्व गाजवले आहे. भारतात खेळल्या गेलेल्या दोन टी-२० मालिकेत भारताला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. २०१५ मध्ये खेळली गेलेली मालिका दक्षिण आफ्रिकेने २-१ ने जिंकली होती. तर २०१८ मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत राहिले होते.
.@RishabhPant17 takes us through his emotions on leading #TeamIndia. ???? ????#INDvSA | @Paytm pic.twitter.com/EVS59jHtMw
— BCCI (@BCCI) June 8, 2022
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हन
संभाव्य भारतीय संघ – इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, व्यंकटेश अय्यर/अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युझवेंद्र सिंग चहल.
संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, ओन्रिक नारखिया, मार्को यान्सेन, तबरेझ शम्सी.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

