मुंबई : सक्तवसुली संचलनालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत 1 ऑगस्ट रोजी अटक केली. पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहार प्रकारणामध्ये ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर अद्याप त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. अशातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संकटाच्या काळात संजय राऊतांची अनुपस्थिती सतावत आहे.
उद्धव ठाकरे यांना राऊतांची स्वातंत्र भेट घेयचीये
उद्धव ठाकरे यांना आर्थर रोडमध्ये असलेल्या संजय राऊतांची भेट घेयची आहे. संजय राऊत यांची जेलर कार्यालयात भेट घेता येईल का? अशी ठाकरे यांच्या कार्यालयाकडून आर्थर रोडच्या जेलरकडे विचारणा करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची स्वातंत्र भेट हवी आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जेलरकडे विनंती केली होती.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्याचबरोबर जर स्वातंत्र भेट घेयची असेल तर न्यायालयात जाण्याचा पर्याय देखील तुरुंग प्रशासनाकडून सुचवण्यात आलाय.
दरम्यान, 5 सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत आता 19 सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत तुरूंगात असणं उद्धव ठाकरेंसमोर मोठं संकट असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- Navneet Rana | पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला – नवनीत राणा
- Chandrasekhar Bawankule | “…अन् 5 कोटी मिळवा”; चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ऑफरच दिली
- Chandrashekhar Bawankule | मजबुत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बारामतीकर नक्कीच साथ देतील – चंद्रशेखर बावनकुळे
- BJP-MANSE | भाजप मनसे युती होणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं स्पष्ट
- Sudhir Mungantiwar । …म्हणून शिवसेनेवर एकनाथ शिंदे यांचाच हक्क; मुनगंटीवारांनी सांगितलं नेमकं कारण
- Udayanraje Bhosale | उदयनराजे सातारकरांना सॉरी म्हणाले कारण…


