🕒 1 min read
मुंबई : शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना या नावावरून आणि पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्य बाणावरून रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गट यावर आपला हक्क सांगत आहेत. त्यांची हि लढाई आता न्यायालयात पोहचली आहे. त्यावरूनच आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली. आज हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा ६२ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, “खरं तर शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये दडली आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकमुळेच शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनेमुळेच सामनाच जन्म झाला. शिवसेनेमुळे मराठी माणसाला न्याय मिळाला आणि हिंदुत्वही टिकून राहिलं. शिवसेना नसती तर मराठी माणसाचं काय झालं असतं? आता काहींना वाटेल मी हे का सांगतोय? मी हे सांगतोय कारण काहींना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू, कोणीही घेऊन जाऊ शकतं. पण तसं नाही.”, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “आज भाजप गादीवर बसले आहे, म्हणून हम करे सो कायदा असं त्यांचं चाललं आहे. नड्डा यांचे मत हे देशातील नागरिकांचे मत आहे का?, भाजपाला संघराज्य पद्धती संपवायची आहे का?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अग्निपथ योजनेवरून त्यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला. त्यांच्याकडे लष्कर चालवण्यासाठी पैसे नाहीत पण राज्यांमधली सरकारं पाडण्यासाठी पैसे आहेत, या शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
महत्वाच्या बातम्या:
- Gulabrao Patil । “गुलाबराव पाटील संपला म्हणणाऱ्यांनी बघावं…”; गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
- Raosaheb Danve । “खासदारकी काय दानवेंच्या बापाची आहे का?”- रावसाहेब दानवे आक्रमक
- Nitin Gadkari | “बावनकुळे माणसाला बाई बनवतील आणि बाईला…”; गडकरींनी उधळली बावनकुळेंवर स्तुतीसुमने
- Pankaja munde | सत्ता स्थापनेत माझा चिमणी, उंदिर किंवा मुंगी एवढाही वाटा नाही- पंकजा मुंडे
- Eknath Shinde | मुंबईनंतर आता पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यातही होणार शिंदेंचं ‘सेनाभवन’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

