Share

Nitin Gadkari | “बावनकुळे माणसाला बाई बनवतील आणि बाईला…”; गडकरींनी उधळली बावनकुळेंवर स्तुतीसुमने

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त झाले होत. त्या पदावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली. यानिमित्ताने आज नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

नितीन गडकरी म्हणाले की, “बावनकुळेंमध्ये खूप जिद्द आहे. सुरुवातीच्या काळात ते रिक्षाचालक होते. पण त्यांचं कर्तृत्व आणि जिद्द एवढी मोठी आहे की, ते माणसालाही बाई बनवतील आणि बाईला माणूस बनवतील. ते कोणती फाइल कशी फिरवतील काही सांगता येत नाही. पण काहीही करून ते लोकांचे प्रश्न सोडवतातच.” तसेच पुढे ते असेही म्हणाले की, “कोणत्याही संघटनेत दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, एक म्हणजे स्वतःला झोकून देऊन काम करणारे आणि दुसरे बोटाने मलम लावणारे कार्यकर्ते. चंद्रशेखर बावनकुळे हे झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांनी वेळ प्रसंगी स्वतःच्या प्रकृतीची आणि घरच्यांचीही काळजी केली नाही. खूप मेहनतीने पक्षाचे काम केले.”

रिक्षा चालक ते भाजप प्रदेशाध्यक्ष

पुढे गडकरी म्हणाले, “एक वेळ होती जेव्हा नागपूर जिल्ह्यातील भाजपची स्थिती तशी चांगली नव्हती आणि त्याच वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात संघटना वाढीसाठी खूप काम केलं. खूप माणसं जोडली, कार्यकर्ते तयार केले. त्यामुळेच पुढे जाऊन फडणवीस सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ऊर्जा मंत्र्यांचे खाते दिले. त्यावेळी त्यांनी विजेच्या पंपाचा बॅकलॉक संपविला. मी हे करणारच ही जिद्द बावनकुळेंच्यात आहे. त्यामुळेच आज एक ऑटोरिक्षा चालक भाजप प्रदेशाध्यक्ष झाला आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!