🕒 1 min read
मुंबई : शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील अस्तित्वाची लढाई आता न्यायालयात जाऊन पोहचली आहे. हा निकाल ज्यांच्या विरोधात लागेल त्यांना पुढे बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागेल, हे निश्चितच आहे. पण शिंदे गटाने मात्र स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मुंबईनंतर आता पुणे, औरंगाबाद आणि ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यालय म्हणजेच सेनाभवन उभारण्यात येणार आहे. तर शिंदे गटाच्या शिवसेना कार्यालयाची पहिली शाखा मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन खासदार राहुल शिवाळे यांच्या हस्ते पार पडले आहे.
शिंदे गटाने जनतेशी संपर्क साधण्यासाठी आणि जनतेच्या मनातील विश्वास जिंकण्यासाठी हे नवीन पाऊल टाकलं आहे. मुंबईत नवं सेनाभवन उभारणार असल्याची माहिती कालच समोर आली होती. त्यानंतर आज शिंदे गटातर्फे मुख्य शहरांमध्ये सेनाभवन उभारणार असून शहरात इतर ठिकाणी काही शाखाही उभारल्या जातील, अशी माहिती मिळत आहे.
बालगंधर्व येथे शिवसेना भवन
राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये सेनाभवन उभारले जाणार आहेत. तर पुण्यामध्ये हे भवन शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच बालगंधर्व रंगमंदिर चौकातील परिसरात उभारण्यात येणार आहे. आज शिंदे गटाचे प्रमोद भानगिरे, आणि अजय भोसले यांनी नव्या कार्यलयाची पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यातील सेनाभवनाचे उदघाटन करण्यात येईल, अशी माहिती प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे.
बॅनरवरून ठाकरे पिता-पुत्र गायब
खासदार राहुल शेवाळे यांनी मानखुर्द या त्यांच्या मतदारसंघात शिंदे गटाच्या शाखेचे उद्धाटन केले. पण आश्चर्याची बाब म्हणजे शेवाळेंनी उद्धाटन केलेल्या शाखेवर स्व. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांचे फोटो मात्र त्यावर नाहीत. यावरूनच शिंदे गटाची उद्धव ठाकरेंबद्दल काय भूमिका आहे, ते दिसून येते.
महत्वाच्या बातम्या:
- Elon Musk | एलोन मस्कने रिलीज केला ‘Sex Tape’, सोशल मीडियावर मजेदार पोस्ट व्हायरल
- Pankaja munde | वडिलांचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावुक, म्हणाल्या…
- Asaduddin Owaisi | भारत पाकिस्तान फाळणीला मुस्लीम जबाबदार नाहीत- असदुद्दीन ओवैसी
- Sonia Gandhi | सोनिया गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
- Ambadas Danve | “शिरसाट यांचं ट्विट रात्रीचंच, अब आगे आगे देखो…”- अंबादास दानवेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
