Share

Raosaheb Danve । “खासदारकी काय दानवेंच्या बापाची आहे का?”- रावसाहेब दानवे आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे जालन्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी काही सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. तर एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना दानवेंचा पारा चढल्याच पाहायला मिळालं. शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील संघर्ष तर सर्वज्ञात आहे. त्यामुळेच शिंदे गटात प्रवेश करण्याआधीच खोतकरांनी दानवेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या दोघांशी चर्चा करून मतभेद विसरून एकत्र काम करण्याचा सल्ला दिला होता. परंतु तरी देखील या दोन्ही नेत्यांमध्ये सार काही आलबेल असल्याचं दिसून येत नाहीये.

आज दानवे माध्यमांशी संवाद साधत असताना पत्रकारांनी त्यांना “अर्जुन खोतकरांसाठी खासदारकी सोडणार का?”, असा प्रश्न केला. त्यावर दानवे चांगलेच आक्रमक झाले. ” जालना लोकसभा मतदारसंघावर भाजपचा अधिकार आहे. खासदारकी काय रावसाहेब दानवेंच्या बापाची आहे का? मी ही जागा सोडेन पण पक्ष सोडणारे का? पक्ष मला म्हणेल तू जा घरी, आम्ही दुसरा आणतो”, अशी झणझणीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच हा मतदारसंघ गेल्या २५ वर्षांपासून भाजपकडेच आहे. त्यामुळे हि जागा सोडण्याचा अधिकार स्वतः रावसाहेब दानवेंना पण नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

उगाच पाणी घालू नका

यावेळी रावसाहेब दानवे यांना आमदार संजय शिरसाट यांच्या नाराजीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “कुणीही नाराज नाही, तुम्ही उगाच पाणी घालू नका. हे सरकार अडीज वर्ष चालणार आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहोत. येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आणि भाजप एकत्र लढतील आणि २०० जागा आम्ही निवडून आणणार आहोत”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!