Share

Pankaja munde | सत्ता स्थापनेत माझा चिमणी, उंदिर किंवा मुंगी एवढाही वाटा नाही- पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : तब्बल ३८ दिवस रखडलेला महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला. पहिल्या टप्प्यातील या विस्तारात शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये ज्यांची नावं चर्चेत होती अशा अनेक आमदारांना संधी मिळालीच नाही. तसेच अपक्ष आणि महिला आमदारांचाही यात समावेश नव्हता. त्यामुळे अपक्ष आमदारांसह शिंदे गटातील आमदारांमध्येही नाराजी असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नाराजीही उघडपणे दिसून येत आहे. त्यावर बोलताना “मी नाराज नाही. माझ्या नाराजीच्या बातम्या पेरू नका”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय चालू आहे हे स्पष्ट होत नाहीये.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज परळीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंकजा मुंडे उपस्थित होत्या. तेव्हा त्या म्हणाल्या कि, “माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे कि, मी नाराज असल्याच्या बातम्या पेरू नका. मी नाराज नाहीये. पण कुठल्या कार्यकर्त्याला असं वाटत नाही की त्यांचा नेता मोठा व्हावा. त्यामुळे प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता कधी ना कधी नाराज होतच असतो. पण मी नाराज नाही. मी माझी ताकद माझ्या पक्षाला दिली आहे. आज माझ्याकडे काहीच नाही म्हणून लोकांना वाटतंय कि माझी ताकद कमी झाली आहे. त्यामुळेच लोक माझ्या पाठीशी आहेत.”

सत्तास्थापनेत माझा रोल नाही

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “राज्यात झालेल्या सत्ता स्थापनेत माझा चिमणी, उंदीर किंवा मुंगी एवढा देखील वाटा नाही. यात माझा काहीही रोल नाही. या सगळ्याबद्दल मी पूर्णपणे अनभिज्ञ होते. सत्ता स्थापन झाल्याचा मला आनंद आहेच. पण मी त्याच खोटं श्रेय घेणार नाही. मंत्रिमंडळात माझा समावेश का केला नाही हे देखील मला माहीत नाही.” दरम्यान त्यांच्या या विधानांवरून त्या नक्की नाराज आहेत कि नाही याचा अंदाज बांधता येत नाहीये. मात्र पक्ष त्यांना पुढील काळात मोठी जबाबदारी देणार असल्याचं पक्षातील इतर बड्या नेत्यांचं म्हणणं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!