Share

Gulabrao Patil । “गुलाबराव पाटील संपला म्हणणाऱ्यांनी बघावं…”; गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केलं आणि चाळीस आमदारांना घेऊन ते गुवाहाटीला निघून गेले. त्यानंतर अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि आता अखेर मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. या सगळ्या काळात अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघापासून दूर होते. मात्र आता मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर हेच आमदार मतदारसंघात जाताना पाहायला मिळत आहेत. असंच आज कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे देखील जळगावला गेले आहेत. त्यावेळी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं.

पाटील यांच्या स्वागतासाठी अनेक वाहने भरून लोक उपस्थित होते. समर्थकांची भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी गुलाबराव पाटलांच्या गाडीवर पुष्पवर्षाव देखील करण्यात आला. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्या स्वागताला आलेली ही गर्दी हेच माझ्यासाठी जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहे. मी अनेक वर्ष लोकांसाठी काम केलं. आज मंत्री झाल्यावर पुन्हा इथे आलो आहे. त्यामुळे आज कोणावर काहीही बोलणार नाही. कोणालाही उत्तर देणार नाही. ही जनता आज माझ्यासोबत आहे, हेच महत्त्वाचं आहे. पण गुलाबराव पाटील संपला, असं म्हणणाऱ्यांनी हे बघावं”, असा टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

शिरसाटांच्या ट्विटवर प्रतिक्रिया

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटातील नाराज आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटवरही प्रतिक्रिया दिली. “आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आजही आदर आहे. तोच आदर संजय शिरसाट यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला असेल. मात्र आता आपण शिंदे गटात आहोत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं असेल.”, असं ते म्हणाले. तर दुसरीकडे ते ट्विट हे मोबाईलच्या तांत्रिक बिघाडामुळे झालं होतं, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिल आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!