Share

गेले ते कावळे, राहिले ते मावळे; महिला रणरागिनींचा शिवसेनेची पुनर्बांधणी करण्याचा निर्धार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्याचे राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारांनी शिवसेनेत आमदारांनी मोठा बंड पुकारला. यामध्ये पक्षाचे तब्बल ३९ आमदार फुटले गेले. तर आता शिवसेना पक्षाकडे फक्त १४ आमदार उरले आहेत. या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. त्यासाठी पक्षप्रमुखांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पक्षप्रमुखांचे पुत्र आदित्य ठाकरे हे ठीक ठिकाणी शिवसेनेचे मेळावे घेऊन जनतेला संबोधित करत आहेत. शिवसैनिकांनी या बंडाला न जुमानता नव्या ऊर्जेने पक्षासाठी काम करावे व पुन्हा पक्षाला मजबुती द्यावी या उद्देशाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कामाला लागले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये आज शिवसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी महिलांचेही मत जाणून घेतले. पक्षप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांना त्यांच्या स्थानिक भागातील समस्यांबाबतही माहिती विचारली. यावेळी महिला रणरागिनींनी शिवसेना पक्षाच्या पुनर्बांधणीचा निर्धार व्यक्त केला. गेले ते कावळे, राहिले ते मावळे, आमच्या हातात शिवसेनेचे पवित्र शिवबंधन बांधलेला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना पुन्हा मजबुतीने उभे करू. अशी भावना ही यावेळी रणरागिनींनी व्यक्त केली.

साताऱ्याच्या रणरागिनीने व्यक्त केली प्रखर भावना
शिवसेनेचे साताऱ्यातील आमदार फुटले याचं आम्हाला क्वचितही दुःख नाही. कारण त्यांनी आमची कामे कधीच केली नाहीत, आम्हाला कधी कोणत्या कार्यक्रमालाही बोलावले नाही. बॅनर वरही कधी आमचा उल्लेख केला नाही. आम्ही पाठवलेल्या पत्रांनाही त्यांनी कधी उत्तर देण्याचे काम केले नाही. त्यामुळे ते गेले असले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. साहेब तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला आम्ही निवडून आणू,असा विश्वासही या महिलेने व्यक्त केला.

काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाट सुटली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, की अपघात तर होणार नाही ना… काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर असलेला माईक आपल्याकडे खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेनेने आयोजित केली होती. या महिला पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!