🕒 1 min read
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची अनुभवी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी दुपारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. २३ वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीचा शेवट करण्याची घोषणा तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली. भारत या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून मितालीच्या निवृत्तीची घोषणा झाल्यानंतर काही तासांनीच संघाची घोषणा करण्यात आली.
टी-२० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या हरमनप्रीतकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. आता मितालीऐवजी ती या फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. स्मृती मंधानाला संघाची उपकर्णधार बनवण्यात आली आहे. टी-२० मध्ये ती संघाची ही जबाबदारी पार पाडत होती. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाला तीन टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. सर्व टी-२० सामने डंबुलामध्ये खेळवले जातील तर एकदिवसीय मालिका कॅंडीमध्ये खेळवली जाईल.
Here are #TeamIndia's ODI and T20I squads for the Sri Lanka series ???? pic.twitter.com/e7yWckJtvG
— BCCI Women (@BCCIWomen) June 8, 2022
२३ जून रोजी खेळल्या जाणार्या टी-२० सामन्यापासून मालिकेच्या दौऱ्याची सुरुवात असेल. दुसरा टी-२० सामना २५ जूनला तर तिसरा सामना २७ जूनला होणार आहे. या तिन्ही टी-२० सामन्यांच्या यजमानपदाची जबाबदारी डंबुलाकडे देण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, पहिला सामना १ जुलैला, तर दुसरा सामना ४ जुलैला आणि शेवटचा एकदिवसीय सामना ७ जुलैला होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने कँडी येथे होणार आहेत.
भारतीय एकदिवसीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (डब्ल्यूके), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, तानिया भाटिया (wk) हरलीन देओल
भारतीय टी-२० संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (डब्ल्यूके), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
