मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्येक क्षणी असे वाटत आहे की, त्यांच्या घोटाळ्याच्या लंकेत हनुमान स्वतः येऊन आग लावणार आहे. ठाकरे सरकारला भीती वाटणे हे स्वाभाविकच आहे. मंत्री जेलमध्ये आहेत, अनेक मंत्री बेलवर बाहेर आहेत, ठाकरे परिवाराची बेनामी संपत्ती आता जप्त व्हायला लागलेली आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थता दिसत आहे. कोणत्याही ही क्षणी उद्धव ठाकरेंच्या घोटाळ्याची लंका जळू शकते, अशा शब्दात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली.
शिवसेनेचे उद्धव ठाकरे रोज उठून सोमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहेत. उद्धव ठाकरे सकाळी उठल्यावर जे सोमय्या ग्राऊंड आहे इथे भाजप ची सभा झाली आहे, ते ग्राऊंड पण किरीट सोमय्या यांची संपत्ती आहे. असे आरोप करून जेल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, असे काल च्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. याचा उल्लेख ही सोमय्यांनी केला.
आता एक काम म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्यांचे आग लावण्याचे काम आणि घोटाळेबाजांवर कारवाई होणार. आता आम्ही सर्वच जण ॲक्शन मोडमध्ये गेलो आहोत. आज देखील मी दिल्लीत एका वरिष्ठ नेत्यांशी बोललो. श्रीधर पाटणकर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांची आणखी एका बेनामी संपत्तीची माहिती मी दिली आहे. पाठपुरावा करण्यासाठी मी गुरुवारी आणि शुक्रवारी दिल्लीला जाणार आहे. आता आदित्य आणी तेजस ठाकरे, श्रीधर पटवर्धन यांच्या बेनामी कंपनी, याच शेल कंपनी कडून आले आहे का ? हे पाहणे आमचे टार्गेट आहे
आदित्य ठाकरे मुंबई मेट्रो ची वाट लावण्यासाठी पर्यावरणाची भाषा करत होते. आता हे माफिया यांना भोंगे ऐकायला येत नाही का? विनापरवाना मशिदीवरील भोंगे बंद व्हायलाच पाहिजे, हे भाजपचे देखील म्हणणे आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत डरपोक आहेत. तुमच्या द्वारा पोलिस तक्रार करायला सांगतात. तुम्ही आरोप केले संजय राऊत यांच्याद्वारे आणि जेल मध्ये टाकायला निघाले होते निल आणि किरीट सोमय्या यांना. ५७ कोटी म्हणत आहे, ५७ पैशाचा कागद दिला नाही. आता जाऊन कागद द्या. आता संजय राऊत देत नाही. हे डरपोक लोक आहेत. स्वतःच्या प्रॉपर्टी जप्त होत आहेत म्हणून भीती आहे. मी सांगतो मुंबई पोलिसांना २ दिवसांत माफी नाही मागितली तर मानहानी चा दावा दाखल करणार, त्यांना त्यांची जागा दाखवणार, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या :


