Share

“सरकार पाडण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करून दंगल…”; एमआयएमच्या नेत्याकडून घणाघात

Published On: 

नाशिक : काल औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबद एमआयएमच्या नेत्याकडून टीका केली जात आहे. सरकार पाडण्यासाठी भाजप राज ठाकरे यांचा वापर करत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे. तसेच “राज ठाकरे यांना राज्यात दंगली घडवयाच्या आहेत ते एक मोठे नेते होते. मात्र, त्यांचे अस्तिव धोक्यात आल्यामुळे भावनिक मुद्दे उपस्थित करत आहेत” असेही म्हणाले.

सभेत बोलतांना राज ठाकरे यांनी एका प्रकारे धमकी दिली आहे. याची राज्य सरकारने दखल घ्यावी. शिवाय ४ तारखेला मशिदीसमोर भोंगे लावून वातावरण बिघडविणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर मोक्का लावण्याची मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

“मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ ऐवजी ४ मे ची मुदत दिली आहे. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला सणात विष कालवायचे नाही. मात्र, ४ मे पासून ऐकणार नाही. ज्या मशिदींवर भोंगे असतील, त्यांच्या समोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालीसा म्हणा”, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद सभेत केले. सरळ भाषेत ‘त्यांना’ कळत नसेल तर एकदा होऊनच जाऊ द्या, असा आक्रमक सूरही त्यांनी लावला.

राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका –

या सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.म्हणाले, “शरद पवार यांना हिंदू या शब्दाचीच अ‍ॅलर्जी आहे. शरद पवार प्रत्येकवेळी भाषणात बोलताना शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेतात. महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी महाराष्ट्र हा शिवछत्रपतींचा आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर हे शिवाजी महाराजांचाच विचार घेऊन पुढे गेले”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!