मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये खेळल्या गेलेल्या रंगतदार सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा (DC vs LSG) पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने एक चूक केली. याबाबत बोर्डाने त्याला फटकारले आणि सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावला.
शॉने आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ गुन्ह्यासाठी शिक्षा स्वीकारली आहे. या चुकीसाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे. पृथ्वी शॉला दंड ठोठावण्यात आला असला तरी त्याने प्रत्यक्षात त्याने काय केले याची माहिती देण्यात आलेली नाही.
IPL 2022: Prithvi Shaw fined for breaching Code of Conduct during clash against LSG
Read @ANI Story | https://t.co/8TXEW60Y7s#IPL #IPL2022 #PrithviShaw #LucknowSuperGiants #LSG #LSGvDC #DCvsLSG pic.twitter.com/edVx3zKfjU
— ANI Digital (@ani_digital) May 1, 2022
असा रंगला सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ४५व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला (DC vs LSG) ६ धावांनी मात देत प्लेऑफच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल, हुडा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनऊने दिल्लीला १९६ धावांचे आव्हान दिले. प्रत्त्युत्तरात दिल्लीकडून ऋषभ पंत, अक्षर पटेल यांनी झुंज दिली पण ते अपयशी ठरले. २० षटकात दिल्लीला १८९ धावांपर्यंत पोहोचता आले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

