Share

“विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय…”, संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा

Published On: 

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (१ मे )सभा घेत १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा दिला. भ्रष्टाचार तसेच बाबरी पाडल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी शिवसेनेला चांगलेच घेरले. बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता. तसेच तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे असा सवालही फडणवीस यांनी केला होता. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचायला हवं.  त्यांनी रावणाचाही इतिहास वाचला पाहिजे. रावणाचा अंत अहंकाराने झाला. रावण त्याच्या अहंकारामुळे धारातीर्थी पडला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काहींना सत्ता गेल्यानंतरही अहंकार येतो. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय अगोदर त्याचा अंत करावा आणि नंतर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावं.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“बाबरी ढाचा पाडला, तेव्हा मी तेथे होतो. भाजपचे नेते अयोध्येत होते. त्यामुळे बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला होता. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता. त्यामुळे  तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, याचा एकदा निकाल लावा.”, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!