सातारा : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या कबरीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सकाळपासून यावर अनेक राजकीय नेत्यांनी भाष्य केलं आहे. अशातच याच मुद्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबत एक वक्तव्य केलं आहे.
उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य-
राजेशाही असती तर असे प्रकार घडले नसते, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. तुम्ही लोकांनी मागणी केली राजेशाही नको लोकशाही हवी. त्यामुळे आज याकूब मेमनच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत. राजेशाही आसती तर कधीच त्या कबरीचा बंदोबस्त आम्ही केला आसता, असं उदनराजे म्हणाले आहेत.
मेमन याने 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात लाखो लोक मारले. त्याच्या कबरीबाबत मागच्या मविआ सरकारनेच हे आदेश द्यायला हवे होते, असं देखील ते म्हणाले आहेत. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली आफजलखानाची कबर खुली करायला हवी, असंही मत यावेळी उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. त्याशिवाय लोकांना छत्रपती शिवाजी महारांजाचा इतिहास कसा कळेल?, अफजलखानाचा वध कसा झाला, ते लोकांना माहिती व्हावे, यासाठी ती कबर खुली करावी असे प्रामाणिक मत असल्याचं उदयनराजे यांनी सांगितलं.
दरम्यान, व्हायरल होत असलेले याकूब मेमनच्या कबरीचे फोटो खोटे असल्याचा दावा करण्यात येतं असून, या प्रकरणाबाबत एकनाथ शिंदे सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे संमजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | एकनाथ शिंदे यांना दाबण्याचे काम पेंग्विन सेनेने केलं – आशिष शेलार
- Subhash Wankhede | “नवनीत राणा या मोदी आणि भाजपच्या अंधभक्त”
- NCP । पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा जन्माला यायचाय, काळू बाळूंनी बारामतीत जाऊन…; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- Aditya Thackeray | याकूब मेमन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचा भाजपवर पलटवार, म्हणाले…
- Atul Londhe | “‘ती’ चूक भाजपने मुद्दामहून केली, कारण त्यांना धार्मिक शांतता नांदू द्यायची नाहीय”


