🕒 1 min read
Udyanaraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकले आहेत. महाविकास आघाडी, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढत्या दबावामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. रायगड किल्ल्यावर जाऊन उदयनराजे यांनी राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आक्रमक पवित्रा घेतला. यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना खोचक सल्ला दिला. यावर प्रत्युत्तर देत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
प्रत्येकाची बुद्धी असते त्याप्रमाणे ते बोलतात. कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही. त्याला फारसे महत्व देत नाही. त्यांच्याबरोबर सरकारी, सहयोगी असतील. महाराष्ट्रात जे घडले त्याबाबत लोकांत जागृती केली पाहिजे. माझे नाव घेतल्याशिवाय काही लोक मोठी होऊ शकत नाहीत, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजें भोसले यांचं नाव न घेता लगावला.
लोकशाहीत मतदार हा राजा असतो. त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष मोठा होऊच शकत नाही. त्यांनी दखल घेतली नाही. पण, लोकांनी त्यांची दखल घेतली तर अडचण होईल. कोणत्याच पक्षाने दखल घेतली नाही, त्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही टप्याटप्प्याने पुढे जाणार आहोत, असंही उदयनराजे म्हणालेत.
काय म्हणाले होते शिवेंद्रसिंहराजे?
“राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीत होत असते. त्यामुळे महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीत जावे आणि राज्यपालांविषयी निर्णय घेण्यास केंद्र सरकारला भाग पडावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांनी उदयनराजेंना दिला होता. पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांबाबत सर्वांनीच जपून बोलले पाहिजे. अपमान, अवमान होईल अशी वक्तवे करू नयेत. इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सगळ्याच पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बोलण्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला शक्य नाही”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
- Aryan Khan | बॉलीवूड करिअरबाबत आर्यन खानने केली मोठी घोषणा, म्हणाला…
- Strep A Infection | UK मध्ये 6 मुलांचा बळी घेणारे स्ट्रेप ए इन्फेक्शन म्हणजे नक्की काय? जाणून घ्या
- 7 Seater Car | 7 सीटर कार घ्यायचा विचार करत असाल?, तर ‘हे’ मॉडेल्स ठरू शकतात बेस्ट ऑप्शन
- Ajinkya Rahane | अजिंक्य रहाणेनं लेकाचं फोटो पोस्ट करत शेअर केलं नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
