Share

Shivendrasinhraje Bhosale | “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”; शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना सल्ला

Published On: 

🕒 1 min read

Shivendrasinhraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकले आहे. महाविकास आघाडी, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढत्या दबावामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. रायगड किल्ल्यावर जाऊन उदयनराजे यांनी राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आक्रमक पवित्रा घेतला. यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना खोचक सल्ला दिला आहे.

“राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीत होत असते. त्यामुळे महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीत जावे आणि राज्यपालांविषयी निर्णय घेण्यास केंद्र सरकारला भाग पडावे, असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांनी उदयनराजेंना लगावला.

पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांबाबत सर्वांनीच जपून बोलले पाहिजे. अपमान, अवमान होईल अशी वक्तवे करू नयेत. इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सगळ्याच पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बोलण्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!