Share

Subhash Wankhede | “नवनीत राणा या मोदी आणि भाजपच्या अंधभक्त”

Published On: 

नांदेड : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण सध्या खूपच तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच एक वेगळाच मुद्दा बाहेर येत आहे. काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकरी भाषा वापरली होती. त्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले होते. पुन्हा याच मुद्यावरून माजी खासदार आणि नुकतेच शिवसेना पक्षात आलेले सुभाष वानखेडे यांनी नवणीत राणा यांना लक्ष्य केलं आहे.

काय म्हणाले सुभाष वानखेडे?

केवळ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व मोदी, शहांचे आपलल्याकडे लक्ष असावे या एकमेव हेतून राणा या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, असं म्हणत सुभाष वानखेडे यांनी नवणीत राणा यांच्यावर हल्ला केला आहे. सुभाष वानखेडे प्रसार माध्यमांशी बोलत होते. भाजप आणि मोदींच्या त्या अंधभक्त आहेत हे यावरून सिद्ध झालं आहे, असा खोचक टोला देखील वानखेडे यांनी लगावला आहे.

आदरणीय नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून अपक्ष निवडून आल्या. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या आशिर्वादाने त्यांना विजय मिळाला होता. उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषा वापरून टीका करण्याती त्यांची लायकी नाही. पुढे वानखेडे असंही म्हणाले की, त्या राजकारणात येण्याआधी काय होत्या हे सगळा महाराष्ट्र जाणतो. त्यामुळे मी त्यावर अधिक काही बोलणार नसल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, “तू शिवसेनावाला है, तू उद्धव ठाकरे है तो मै भी राणा हू”`, अशी भाषा वापरत नवणीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात अतिउत्साहात ृ आमने-सामने येण्याचे आव्हान दिले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!