मुंबई : विघ्नहर्त्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप वर निशाणा साधला आहे. एका आतंकवाद्याच्या कबरची सजावट करण्यात आली असून यावरुन भाजपने अनेक वेळा ठाकरे सरकारवर टीका केली. याला उत्तर देत आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
भाजप सरकारने याकूब मेमन याची कबर बांधण्यासाठी परवानगीच दिली कशी? – आदित्य ठाकरे
भाजपने याकूब मेमनची कबर बांधण्यासाठी परवानगीच दिली कशी? असा सवाल करत जे गद्दार आहेत, त्यांना गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? असा प्रश्नही त्यांनी केला. सणासुदीच्या काळात राजकारण करू नये, याकूब मेमन प्रकरणात काही तथ्य समोर आलं पाहिजे, त्या माणसाचं दफनच का झालं? तो अतिरेकी होता. त्याचं दन करण्याची गरज नव्हती, दफन करायचं असेल तर एनओसी घ्यायची असते, ती घेतली नाही, ती का घेतली नाही? पालिकेचा या प्रकरणाशी संबंध नाही. ती एक खासगी संस्था आहे, एका अतिरेक्याला एवढा मानसन्मान का दिला? तेव्हा केंद्रात आणि राज्यात कुणाचं सरकार होतं? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला.
याकूब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आलीः
दरम्यान, 1993 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 257 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी ठरल्याने याकुब मेमनला 2015 मध्ये फाशी देण्यात आली होती. यावेळी त्याचं शव त्याच्या परिवाराला सोपवण्यात आलं असून त्यावेळी फडणवीस सरकार होती, असा आरोप शिवसेनेनी केला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Ajit Pawar । नव्याचे नऊ दिवस, पक्षाने तिकीट कापले हीच यांची विश्वासार्हता; अजित पवारांनी उडवली बावनकुळेंची खिल्ली
- Ravindra Waikar | शिवसेनेचे नेते रवींद्र वायकरांवर किरीट सोमय्यांनी केला 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- Ajit Pawar : बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल, अजित पवारांचा फडणवीसांना इशारा
- Aditya Thackeray | याकूब मेमन कबर सजावटीवरून आदित्य ठाकरेंचे भाजपला प्रत्युत्तर, म्हणाले…
- Supriya Sule | “राज्याला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे, एक…”, सुप्रिया सुळेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

