Share

‘महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो असतो का ? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे’

Published On: 

सातारा : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.

भाजपचे तोंड बंद आंदोलन तर भिडेंकडून अजून सातारा सांगली बंदची हाक नाही, राऊतांचा टोला

यावर राज्यात राजकारण पेटलं असताना उदयनराजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही. अस स्पष्टीकरण उदयनराजेंनी दिले आहे.

तर, सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता तर मी गप्प बसलो असतो का? तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. अस देखील उदयन राजे म्हणाले आहेत. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेबांना विचारा काय झालं अस देखील उदयनराजे भोसले तर व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती अस देखील उदयनराजे भोसले म्हणाले.

चंद्रकांत पाटलांच्या नावे खंडणी मागणाऱ्या तरुणाला अटक!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!