मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
सरकारी कोविड सेंटरपेक्षा मराठी शाळांची सुविधा उत्तम; राळेगणसिद्धिच्या ग्रामस्थांची भूमिका !
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. आता या वादात शिवसेनेने उडी घेतली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ‘छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही’. अस ट्विट करत संजय राऊत यांनी भाजप आणि संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शेतकरी हिताची भुजबळांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने केली मान्य
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही…
जय भवानी!
जय शिवाजी!!!!!!!— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

