पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवार (दि. २० जुलै) रोजी धक्कादायक प्रकार समोर आला होता. थेट चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलत असून २५ लाखांची मागणी करणारा फोन एका नामांकित खाजगी रुग्णालयाला करण्यात आला होता. यानंतर या रुग्णालयातील डॉक्टरांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकार त्यांच्या कानावर टाकला होता.
तर आता या फेक पीएला निगडी पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. हा तरुण पुण्यात राहणारा असल्याचे पोलिसांकडून कळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी, ‘कोरोना महामारीचा सामना करताना, काहीजण याचा गैरफायदा घेत असल्याचे,’ सांगितले होते.
भाजपचे तोंड बंद आंदोलन तर भिडेंकडून अजून सातारा सांगली बंदची हाक नाही, राऊतांचा टोला
सोमवार दि. २० जुलै रोजी पिंपरी-चिंचवड आणि कोथरुड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला होते. “माझ्या नावाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आ. लक्ष्मण जगताप यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.
शेतकरी हिताची भुजबळांची ‘ही’ मागणी केंद्र सरकारने केली मान्य
तर त्याचदिवशी, कोथरुड स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. तसेच, असे प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी सूचना ही चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार: कोरोना पॉझिटिव्ह महिलेलाच दिला डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

