Share

आस्तिक कुमार पांडे यांची बदली, ‘हे’ आहेत औरंगाबादचे नवे महापालिका आयुक्त

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी औरंगाबादचे नवे महापालिका आयुक्त म्हणून सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांची बदली औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकपदी करण्यात आली आहे. दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारावा असे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिले आहेत.

राज्य सरकारने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. याच बैठकीत औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अस्तित कुमार पांडे यांची बदली करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

औरंगाबादचे नवे महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी
भुसावळचे डॉ. व्हि.जी.चौधरी व डॉ. छाया चौधरी यांचे चिरंजीव असलेले अभिजीत चौधरी यांचे शालेय शिक्षण भुसावळला के. नारखेडे विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. एम.बी.बी.एस. केल्या नंतर त्यांनी दिल्ली येथे स्पर्धा परिक्षेची तयारी केली. २००३ पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रशासनातील वेगवेगळ्या प्रयोगातुन यंत्रणा गतीमान व प्रभावी करण्यासाठी ते ओळखले जातात. सांगली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये त्यांचे कोरोनाच्या काळातील दमदार कार्याचे राज्यभरातून कौतुकही झालेले आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती केली आहे. ते ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कार्यरत होते. फणसळकर यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची मे २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता फणसळकर यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!