मुंबई : खुर्चीचे संकट असताना महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे. यानंतर पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) पर्यंत राज्यपालांनी मुदत दिली आहे.
यानंतर शिवसेनेने राज्यपालांच्या या आदेशाविरोधात कोर्टात अपील केली आहे. यानंतर सध्या सुप्रीम कोर्टात हा युक्तिवाद जवळपास साडे तीन तास सुरु होता. यानंतर याचा निकाल हाती आला आहे. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या ११ ते ५ यावेळेत बहुमत चाचणी होणार आहे. राज्यपालाच्या सूचनेनुसार उद्या हि चाचणी होणार आहे. तसेच उद्या एकनाथ शिंदे देखील या बहुमत चाचणीला उपस्थित राहणार आहे. यानंतर या चाचणीला नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना देखील चाचणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आज रात्री ९ वाजता फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. ते म्हणाले कि, आज मी आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आशीर्वाद दिले. मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. असं देखील ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जी कायदेशिर प्रक्रिया होईल त्याला सामोरे जाऊ. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलले आणि अत्यंत भावूक होत ते म्हणाले, या अडीच वर्षात तुम्ही खूप सहकार्य केले. जर माझ्या कडून कोणाचा अपमान झाला असेल, दुखावले असेल तर मी माफी मागतो. तसेच ज्या खात्यांचे विषय राहिले ते पुढच्या कॅबिनेटमध्ये घेवू, असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

