मुंबई : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. आता निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हावर कारवाई करू शकतो. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहीणीशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते. आज बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेत देखील, आणि लोकसभेत देखील आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे या देशात जे निर्णय होतात. ते या देशातील, घटना आणि कायद्यांच्या आधारावर होतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करुन विरोधकांची स्थगितीची मागणी फेटाळली आहे.”
“निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र विभाग आहे. स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आहे. त्यामुळे काही निर्णय कोर्टात होतात. तर काही निर्णय निवडणूक आयोगात होतात. निवडणूक आयोगाने ऐकायचंच नाही, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया-
शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. निवडणूक आयोग निर्णय देऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. धक्का बसण्याचा प्रश्नच नाही. ते म्हणाले की, अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरूच राहणार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Anil Desai | शिवसेनेच्या निकालावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Supriya Sule | “तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा, मात्र…” शिंदे-ठाकरे लढाईत सुप्रिया सुळेंची उडी
- Shivsena । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद पेटला! सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना पहिला मोठा धक्का
- Sudhir Mungantiwar | वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – सुधीर मुनगंटीवार
- “तानाजी सावंत म्हणाले होते, महाराष्ट्राला भिकारी बनवेल पण…”, राहुल मोटेंनी केले अनेक खुलासे


