Share

Aaditya Thackeray | “गद्दारांना दिलासा नाही तर…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया!

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल देत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. आता निवडणूक आयोग शिवसेनेच्या चिन्हावर कारवाई करू शकतो. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. गद्दारांना दिलासा मिळाला नाही. दिलासा नाही तर युक्तिवादाचं कोर्ट बदललं आहे. जे सर्वोच्च न्यायालयात होत. ते आता निवडणूक आयोगाकडे दिले आहे. तिथे युक्तिवाद सुरू राहील. जे होत आहे ते जनतेच्या समोर होत आहे. हा युक्तिवाद शिवसेनेसाठी महत्वाचा नाही तर देशातील संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी महत्वाचा राहील.”

“आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, सत्य आमच्या बाजूने आहे. जसा विजयादशमीला विजय झाला तसा शिवसेनेचा विजय होईल. जेव्हा जेव्हा शिवसेने धक्का बसतो तेव्हा गद्दारांच्या गटात जल्लोष साजरा होतो. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झाले तेव्हा टेबलावर चढून ते नाचले होते. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?-

एकनाथ शिंदे म्हणाले, ” सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते. आज बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेत देखील, आणि लोकसभेत देखील आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे या देशात जे निर्णय होतात. ते या देशातील, घटना आणि कायद्यांच्या आधारावर होतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करुन विरोधकांची स्थगितीची मागणी फेटाळली आहे.”

“निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र विभाग आहे. स्वतंत्र निवडणूक यंत्रणा आहे. त्यामुळे काही निर्णय कोर्टात होतात. तर काही निर्णय निवडणूक आयोगात होतात. निवडणूक आयोगाने ऐकायचंच नाही, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया-

शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, “आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. निवडणूक आयोग निर्णय देऊ शकतो, असे त्यात म्हटले आहे. धक्का बसण्याचा प्रश्नच नाही. ते म्हणाले की, अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरूच राहणार आहे.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!