मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज पार पडली. यामध्येच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. याआधी निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता अमृता फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अमृता फडणवीस यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की हायकोर्टाने जो निर्णय दिला होता तोच सुप्रीम कोर्टानेही दिला आहे. आता हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात गेला आहे. अशात इलेक्शन कमिशन काय करतं त्याची वाट पाहू असं म्हणत अवघ्या एका ओळीत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय –
आता खरी शिवसेना कुणाची. शिवसेनेच चिन्ह धनुष्यबाण कुणाला द्यायचं हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी जे काही पुरावे दिलेत त्यावरून निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. मात्र सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारा ठरणार आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी पहिला मोठा धक्का आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aaditya Thackeray | “गद्दारांना दिलासा नाही तर…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया!
- Thackeray vs Shinde | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
- Sandipan Bhumre | संदीपान भुमरेंचे मतदार संघात लक्ष आहे का? प्राथमिक सुविधांचा बट्ट्याबोळ!
- Anil Desai | शिवसेनेच्या निकालावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Supriya Sule | “तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा, मात्र…” शिंदे-ठाकरे लढाईत सुप्रिया सुळेंची उडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

