🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरमधील तणावपूर्ण स्थिती पाहता कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तसेच स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे कलम १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे तोपर्यंत या परिसरात लष्कराचे वर्चस्व राहणार आहे.
काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरु आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती तसेच पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोन यांना मध्यरात्रीपासून नजरकैद करण्यात आलं आहे.
यावरून जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाष्य केले आहे. ‘भाजपमध्ये असूनही अटलबिहारी वाजपेयी यांना काश्मिरी जनतेविषयी सहानुभूती होती. त्यांनी काश्मीरमधील जनतेचे प्रेम कमावले होते. आज त्यांची सर्वाधिक उणीव जाणवत असल्याचे ट्विट मुफ्ती यांनी केले आहे.
Vajpayee ji despite being a BJP leader empathised with Kashmiris & earned their love. Today we feel his absence the most.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) August 4, 2019
दरम्यान, जोपर्यंत पुढील आदेश येत नाहीत तोपर्यंत राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे.
#पक्षांतर : आता चक्क भाजपचाच आमदार शिवसेनेच्या गळाला ?
हाऊसफुल्लचा बोर्ड असला तरी १० तिकीटं असतातच : पाटील
#पक्षांतर : शिवसेना प्रवेशावर भाजप आमदार म्हणतात…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
