Share

#पक्षांतर : शिवसेना प्रवेशावर भाजप आमदार म्हणतात…

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहत आहेत. त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली असून नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेशाचा धडाकाच लावला आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून नांदेडचे एकमेव भाजपचे आमदार तुषार राठोड आता शिवसेनेच्या गळाला लागल्यचा चर्चा आहेत.

दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. 2 ऑगस्ट रोजी सकाळी शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्ह्यातील विधानसभेचे एकमेव आमदार असलेले डॉ. तुषार राठोड हे शासकीय विश्रामगृहात पोहोचले. विश्रामगृहात पोहोचून आमदार राठोड यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी तिथे माजी पालकमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, देगलूर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, ऑगस्ट रोजी मी आदित्य ठाकरे यांच्या भेटीला शासकीय विश्रामगृह येथे गेलो होतो, पण ही भेट सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिली आहे. शिवसेना-भाजप युती आहे आणि आदित्य ठाकरे हे नांदेड शहरात आले आहेत याची माहिती मिळाल्याने मी केवळ त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी मला दोन दिवस सराव करावा लागला : सचिन अहिर

जयंत पाटलांची पक्षावरील पकड कमी झालीय का?

युतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत

आपण भाजपात जावं ही जनतेचीचं मागणी : वैभव पिचड

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!