Share

हाऊसफुल्लचा बोर्ड असला तरी १० तिकीटं असतातच : पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपाटावर शह काटशह चं राजकारण सुरु झालं आहे. कधी कोण कोणाच्या गळ्याला लागेल आणि कोण कोणाची साथ सोडेल याचा काही नेम नाही. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सुरुंग लावला होता. त्यामुळे आता भाजपला हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागला आहे.

तसेच मेगा भरतीचा बुधवारचा महाइवेंट प्रचंड यशस्वी झाला. त्यामुळे आता भाजपमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नाही. त्यामुळे जसा सिनेमा हिट ठरल्यावर हाऊसफुल्लचा बोर्ड लावावा लागतो, तसा बोर्ड भाजपच्या कार्यालयाबाहेर लावण्याची वेळ आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, जे योग्य आहेत त्यांना प्रवेश दिला आहे. जे योग्य नाहीत त्यांना जागा नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर चंद्रकांत पाटलांनी सिक्सर मारला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, हाऊसफुल्लचा बोर्ड लागला असला तरी थिएटर वाल्याकडे स्वतःची 10 तिकिटं असतातच असं सांगत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा भरती चालूच आहे असे संकेत दिले.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अनेक आमदारांनी भाजपचा रस्ता धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असताना सत्ताधाऱ्यानी राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतल्याने राष्ट्रवादी पक्षात अस्थिरता निर्माण झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी मला दोन दिवस सराव करावा लागला : सचिन अहिर

येत्या 13 ऑगस्टला राज्यात अजून एक राजकीय बॉम्बस्फोट होणार : चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी, शरद पवार यांच्याशी आपण एकनिष्ठ, ‘या’ खासदाराने केला दावा

शिवेंद्रराजेंच ठरलं ! विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला राजीनामा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!