🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले या मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दिपाली सय्यद भोसले मागील काही दिवसांपासून सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. कधी पत्रकार परिषद घेऊन तर कधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. आता दिपाली भोसले यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. फडणवीसांवर त्यांनी बोचरी टीका केली आहे.
आपण बाबरी पाडण्यासाठी ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्येला गेलो होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सोमय्या मैदानावर झालेल्या सभेत जाहीरपणे केले होते. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही आपल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी पाडल्याच्या दाव्यावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. “तुम्ही बाबरी पाडायला गेला होतात की शाळेच्या सहलीला गेला होतात. तुमचं वय काय होतं तेव्हा? काय तुमचं वय? बोलता किती? करता काय?” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली होती.
आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाबरी पाडल्याच्या दाव्यावर, दिपाली सय्यद भोसले यांनी बोचरी टीका केली आहे. “जे म्हणतात की माझी बायको माझं काही ऐकतच नाही. ज्यांची बायको काहीही बोलते, काहीही चालते. ज्यांच्या हातात आपल्या बायकोचा कंट्रोल नाही, ते म्हणतात की मी बाबरी मशीद पाडायला मी गेलो होतो,” अशा शब्दात दिपाली सय्यद भोसले यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या :


