औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आता यावरच मनसे नेते सुमित खांबेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
“स्व.बाळासाहेबांची संपूर्ण विचारसरणी बाजूला सारून काँग्रेसशी आघाडी शिवसेना करू शकते, तर AIMIM शी आघाडी करणार नाही, ह्याबाबत शंकाच आहे. हिंदुत्वाला ज्यांनी तिरांजली दिली ते सत्तेसाठी काहीही करू शकतात. हे महाराष्ट्राला अडीच वर्षांपूर्वीच कळलं आहे. असे विधान सुमित खांबेकर यांनी केले आहे. आता या प्रतिक्रियेवर शिवसेना काय उत्तर देते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या या पक्षांनी शिवसेनेची साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात उभे राहण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला होता. त्यामुळे आता आम्हीही त्यांना प्रस्ताव दिला असून भविष्यात यांनी आमच्यावर आरोप देण्यापूर्वी विचार केला पाहिजे की, भाजपला दूर राहण्यासाठी एमआयएम कुणासोबतही जाण्यास तयार आहे. असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

