Share

आई झाल्यानंतर अनुष्काचा मोठा निर्णय!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनुष्का आई झाल्यानंतर अभिनय क्षेत्रापासून काहीशी दूर होती. पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अनुष्काच्या चाहत्यांमध्ये याबाबत जोरदार चर्चा होत आहे

अनुष्काने काही काळापूर्वी अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं होतं, मात्र अनुष्काने तिचे प्रॉडक्शन हाऊस आता सोडले आहे. तिने तिच्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ती प्रोडक्शन हाऊसमधून बाहेर पडत आहे. अभिनेत्रीने पोस्टद्वारे तिचे प्रोडक्शन हाउस ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ सोडण्याची घोषणा केली आहे. अनुष्का गेल्यानंतर कंपनी बंद होणार नसली तरी आता फक्त तिचा भाऊ हे काम सांभाळणार आहे.

पोस्टमध्ये अनुष्काने लिहिले की, तिने आतापर्यंत जे काही काम केले आहे त्याचा तिला अभिमान आहे. पण आई झाल्यानंतर तिला अनेक गोष्टींचा समतोल साधावा लागत आहे. त्यामुळे ती अभिनयाची निवड करत आहे.
अनुष्का आता फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करणार असून तिच्या भावाने सुरू केलेले प्रॉडक्शन हाऊस ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ आता फक्त तोच सांभाळणार आहे. पोस्टमध्ये अभिनेत्रीने असेही लिहिले आहे की, यामध्ये ती तिच्या भावाला नेहमीच प्रोत्साहन देईल. यासाठी अनुष्काने कर्णेशला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!