🕒 1 min read
मुंबई: गुजरात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकवण्यात येणार आहे. गुजरात सरकारने हा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली आहे. यावर अनेक प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
“भगवद्गीता संघ/भाजपा नेत्यांनी वाचली असती तर द्वेष, तिरस्कार सोडला असता (अ.१२/श्लोक १३-१४), भोंदू साधू, साध्वी योगींना थारा दिला नसता (अ.६/४ व२९), मोदी कमी झोपतात सांगितले नसते (अ.६/१६) १६वा अध्याय भाजपासाठीच आहे. गीतेनुसार भाजपा/संघ नेत्यांना मोक्ष मिळणे मुश्कील आहे”, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.
भगवद्गीता संघ/बीजेपी नेता पढ़ते तो नफरत, तिरस्कार छोड़ देते। (अ१२/१३-१४) पाखंडी साधु, साध्वी एवं योगीओंको दरकिनार करते।(अ६/४,२९) मोदीजी कम सोते हैं ऐसा नहीं कहते।(अ६/१६)
अध्याय 16 सिर्फ बीजेपी के लिए है। गीताके अनुसार भाजपा/संघ नेताओं के लिए मोक्ष पाना कठिन है। (अ18/27,28,71)— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 18, 2022
दरम्यान भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील अशी माहिती जितू वाघानी यांनी सभागृहात दिली आहे.
महत्वाची बातमी –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
