Share

बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी करा ‘ही’ महत्वाची क्रिया!

Published On: 

🕒 1 min read

लातूर : पेरणीपूर्वी बियाणाचे रोग-किडीपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. वाढीव उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणीनंतरच नाही तर पेरणीच्या पुर्वीही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. उभ्या पिकांमध्ये दिसणाऱ्या रोगांचे मूळ हे बियाणांमध्येच असते त्यामुळे जमिनीत गाढले जाणारे बियाणे हे चांगल्या प्रतीचे असावे जेणेकरून उत्पादनात वाढ होईल. बीजप्रक्रिया कशी करावी? पाहूया सविस्तर..

अशी करावी बीजप्रक्रिया –

बीजप्रक्रियेसाठी 10 किलो बियाण्यास 200 ग्रॅम/ 200 मिलि जिवाणू खत हलक्या हाताने सर्व बियाण्यास सारख्या प्रमाणात लावा. जेणेकरून बियाण्याच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात जिवाणू खताचा थर तयार होईल. अशा प्रकारे एक किंवा एकापेक्षा अधिक जिवाणू खताचा वापर करून बियाणे सावलीत वाळवा. भात, ज्वारी, नागली, तृणधान्ये, शेंगावर्गीय पिके, नगदी पिके, गळीत धान्ये अशा विविध पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे.

बीजप्रक्रिया करताना ही काळजी घ्या –

प्रक्रिया केलेले बियाणे हे हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा. तसेच प्रक्रिया केलेले बियाणे हे सावलीतच ठेऊन वाळवून पेरा. या प्रक्रियेसाठी ड्रम किंवा मडक्याचा योग्य वापर करा. मडक्यात योग्य प्रकारे बियाणे आणि औषधे मिसळून त्याचे तोंड हे फडक्याने बांधून मडके हे हलवा. औषध आणि बियाणे याचे चांगले मिश्रण होईल.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!