🕒 1 min read
मुंबई: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. आता यावरच काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“AIMIM ने अनेक राज्यांत भाजपा ची सत्ता आणण्यासाठी थेट मदत केली आहे. भाजपा जीथे जीथे हरण्याची परिस्थिती निर्माण होते तिथे ओवेसींची भाषा ही भाजपाला पूरक ठरते असे जनतेचे मत आहे. बिहार मध्ये AIMIM ने भाजपचे सरकार आणले हाच डेटा सांगतो तर युपीतही भाजपाला मदत झाली.”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
AIMIM ने अनेक राज्यांत भाजपा ची सत्ता आणण्यासाठी थेट मदत केली आहे. भाजपा जीथे जीथे हरण्याची परिस्थिती निर्माण होते तिथे ओवेसींची भाषा ही भाजपाला पूरक ठरते असे जनतेचे मत आहे. बिहार मध्ये MIM ने भाजपाचे सरकार आणले हाच डेटा सांगतो तर युपीतही भाजपाला मदत झालीhttps://t.co/8EtwKWQuri
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 19, 2022
दरम्यान स्वतःला सेक्युलर मानणाऱ्या या पक्षांनी शिवसेनेची साथ दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात उभे राहण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला होता. त्यामुळे आता आम्हीही त्यांना प्रस्ताव दिला असून भविष्यात यांनी आमच्यावर आरोप देण्यापूर्वी विचार केला पाहिजे की, भाजपला दूर राहण्यासाठी एमआयएम कुणासोबतही जाण्यास तयार आहे. असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
