Share

IPL 2022 LSG vs DC : देखो वो आ गए..! टॉसदरम्यान दिल्लीनं दिली खूशखबर; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing XI

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये (IPL 2022) आज १५वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली आहे. दिल्ली संघात डेव्हिड वॉर्नर आणि एनरिक नॉर्किया यांचे आगमन झाले असून लखनऊने मनीष पांडेला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या गेल्या सामन्यातील पराभवानंतर दिल्लीच्या संघाला या सामन्यात विजयाची नोंद करायची आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सला हॅट्ट्रिक साधायची आहे. ४ मार्च रोजी झालेल्या सामन्यात लखनऊने सनरायझर्स हैदराबादचा १२ धावांनी पराभव केला.

दोन्ही संघांची Playing XI

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान.

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कप्तान/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सरफराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिझूर रहमान, एनरिक नॉर्किया.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.marathi.maharashtradesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!