Share

अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या २१ कोविड केअर सेंटर्सची विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पथकाने तपासणी केली आहे. या तपासणीत ९ कोविड केअर सेंटरबद्दल रुग्णांची कोणतीही तक्रार नसल्याचे निदर्शनास आले. तर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ९ कोविड सेंटर बंद झाले असून एका सेंटरमध्ये औषधीचा तुटवडा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त जगदिश मनियार यांनी हा अहवाल मंगळवारी (दि.२५) सादर केला आहे. मात्र हा अहवाल लवकर सादर झाला असता तर आणखी त्रुटी निघण्याची शक्यता होती.

औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने मार्च आणि एप्रिल महिन्यात चांगलाच उद्रेक माजवला होता. त्यावेळी दररोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे पालिकेने तातडीने कोविड केअर सेंटर सुरू केले. टप्याटप्प्याने या कोविड सेंटरमध्ये वाढ करीत त्यांची संख्या २१ झाली. या कोविड केअर सेंटरमध्ये दररोज हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत होते. पालिकेच्या डॉक्टर व कर्मचार्‍यांनी अहोरात्र परिश्रम घेत कोरोना रुग्णांना बरे करुन घरी पाठवले.

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मिळणार्‍या सोयी, सुविधाची तपासणी व शासन निर्देशानुसार कार्यवाही होत असल्याची खात्री करुन घेण्यासाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या आदेशावरुन २२ एप्रिल रोजी तपासणी पथक स्थापन केले. मात्र नियुक्‍तीनंतर या पथकाने तपासणीसाठी महिनाभराचा उशीर करत अखेर २० मे रोजी शहरातील २१ कोविड केअर सेंटरची तपासणी केली. या तपासणीमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुला-मुलींच्या वसतीगृहातील कोविड रुग्णांना औषधींचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्याने रुग्णांना बाहेरुन काही औषधी खरेदी करुन आणावे लागत आहे. या कोविड सेंटरमध्ये तातडीने औषधींचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे पथकाने नमुद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!