Share

वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ‘त्या’ हातांना ऊर्जामंत्र्यांकडून दिलासा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या भयंकर परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अहोरात्र सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांपैकी कोरोनाबाधित कर्मचार्‍यांना उपचाराच्या तसेच विलगीकरणाच्या कालावधीची पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. तसेच वेतनश्रेणी तीन व चारच्या सर्व कर्मचार्‍यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी विशेष बाब म्हणून एकवेळ एक हजार रुपये देण्याच निर्णय घेण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या कोरोनाबाधित कर्मचार्‍यांच्या वारसांना एकूण ५० लाखांचे अर्थसहाय्यदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार, महावितरण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सदरील निर्णय घेत कर्मचार्‍यांना कोरोना काळात वैद्यकीय व आर्थिक सुरक्षा कवच देणारे परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, कोरोनाबाधित कर्मचार्‍यांच्या उपचाराचा किंवा विलगीकरणाचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजून पगारी रजा मंजूर करण्यात आली आहे. वेतनश्रेणी तीन व चारमधील सर्व कर्मचार्‍यांना सॅनिटायझर किट खरेदीसाठी एकवेळा एक हजार रुपये विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे.

कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेणार्‍या कर्मचार्‍यांना ५० हजार रुपये आणि घरी किंवा संस्थात्मक कक्षात विलगीकरणात उपचार घेणार्‍या कर्मचार्‍यांना २५ हजार रुपये अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्कर्सची मान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असून राज्यातील २७ जिल्ह्यांमधील कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्कर्सप्रमाणे दर्जा देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यातही लवकरच निर्णय घेतला जाईल.

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना ३० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य तसेच विम्याचे २० लाख असे एकूण ५० लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणच्या सर्व नियमित (प्रशिक्षणार्थी व सहायक यांच्यासह) व बाह्यस्त्रोत कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या वारसांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!