Share

‘सत्तेसाठी एकमेकांना चिकटलेले पक्ष कुठेही जाणार नाहीत; फक्त लोकांना मूर्ख बनवणं सुरु’

Published On: 

भंडारा : पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने ७ मे घेतला होता. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे 25 मे 2004 च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. मात्र, याच पदोन्नतीच्या वादामुळे काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पदोन्नीतील आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते. यानंतर, पदोन्नतीच्या जीआरला पुन्हा एकदा स्थगिती देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले होते.

मात्र, या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस असल्याचं उघड झालं आहे. काँग्रेसने पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याला विरोध केला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून भाजपने काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी असल्याची टीका केली आहे.

आता यावर माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य करताना महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे. ‘हे फक्त सामाजिक न्यायाच्या गोष्टी करतात. मात्र त्यांच्या कृतीत सामाजिक न्याय कुठेही नाहीये. एका पक्षाने एक भूमिका घ्यायची व दुसऱ्या पक्षाने विरोधी भूमिका घ्यायची आणि लोकांना मूर्ख बनवायचं हे धोरण यांचं सुरु आहे. हे कुठेही जाणार नाहीत. सत्तेसाठी एकमेकाला चिकटलेले ही लोकं आहेत, ते चिपकूनच राहणार,’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!