मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला खासदार संभीजीराजे छत्रपती यांनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळा पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
यानंतर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपला लक्ष्य केलं होतं. संभाजीराजे हे आता आक्रमक झाले असून येत्या २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.
भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी असताना संभाजीराजेंनी भाजपवरच नाराजी व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. खासदारकीचा राजीनामा दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, अशी भूमिका देखील त्यांनी व्यक्त केली होती.
आता, संभाजीराजे हे उद्या (२७ मे) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं समोर येत आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सकाळी ९.३० वाजता ते शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी पवारांची भेट घेतील. त्यामुळे उद्या या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याकडं आता सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वेडी ही माया! कोरोनाग्रस्त मुलासाठी आईने पीपीई किट घालत दिली डॉक्टरांना साथ
- महत्वाची बातमी : आता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार
- ‘वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे तर भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख’
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस


