रांची : भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 1 कोटी जनता प्रभावित झाल्याचे म्हटले आहे.
ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता यास चक्रीवादळाने झारखंडच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. या तिन्ही राज्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभरात सुमारे 12 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
मात्र, आता झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे. ‘यास चक्रीवादळाने त्याची लँडफॉलची प्रक्रिया दुपारी अडीचच्या सुमारास पूर्ण केली आहे. मात्र, या भागामध्ये उद्या दुपारपर्यंत पाऊस राहणार आहे. उद्या म्हणजेच 27 मे रोजी सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. कारण समुद्र या काळात खवळलेला असेल’, अशी माहिती भुवनेश्वर वेधशाळेतील ज्येष्ठ वैज्ञानिक उमाशंकर दास यांनी दिली आहे.
दरम्यान , ‘यास’ चक्रीवादळामुळे 6 राज्यात पश्चिम बंगाल, ओडिशा, तमिळनाडू, झारखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस येणार असल्याचा हाय अलर्ट देण्यात आला आहे. ओडिशा पश्चिम बंगालसह तमिळनाडू कर्नाटकमध्ये मंगळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात या वादळाचा मोठा धोका पाहायला मिळतो आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आधी भाजपवर नाराजी, आता संभाजीराजे उद्या पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण !
- महत्वाची बातमी : आता जून महिन्यात केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार
- ‘वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे तर भ्रष्टाचाराचा महामेरू अशी राणेंची ओळख’
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस


