Share

पाण्याच्या तुटवड्याने म्हसला बुद्रूक ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालूक्यातील म्हसला बुद्रूक येथे एक ते दिड महिन्यापासून नळाला पाणी येत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून तसेच गावाला पाणी पूरवठा करणारी विहिर बोरगांव बाजारच्या पूर्णा नदिपात्रात असून या पाणी पूरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे गावात एका महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे महिलांना परिसरातील खासगी विहिरीतून पाणी शेंदून आणावे लागत आहे.

ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतविरोधात रोष वक्त केला आहे. काही दिवसांपासून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक नाही यामुळे सर्व गावातले विकास काम रखडली आहे. विहिर अधिग्रहण प्रस्ताव दाखल केले जाऊ शकत नाही. त्यामुळे गावक-यांना पाण्याचा शोध घेण्यासाठी आपली मोल मजुरी सोडून जावे लागत असून अनेक महिलांनाही पाण्यासाठी जंगलात फीरावे लागत आहे. भर उन्हाळयात पाणी टंचाईची वेळ आल्याने वरिष्ठ अधिका-यांनी या गावाकडे लक्ष देऊन पाण्यासाठी होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी केली आहे.

गटविकास अधिका-यांना वारंवार पुर्वकल्पना देऊनही एक ते दीड महिन्यापासून गावात ग्रामसेवक नाही. यामुळे विहिर अधिग्रहण प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविता येत नाही. तसेच वरिष्ठ अधिकारी कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सरपंच कमलाबाई गोराडे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!