🕒 1 min read
औरंगाबाद:खाम नदीचे पुनरुज्जीवन करून त्याठिकाणी उभारलेल्या उद्यानाला दिलेल्या आमदार-खासदारांच्या नावाला शहरातील विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. भाजप, एमआयएमने या नावांना विरोध दर्शवला आहे. आता माजी महापौर विजया रहाटकर(Vijaya Rahatkar) यांनीदेखील आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांना पत्र पाठवत महानगरपालिका प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. आपली परवानगी न घेता नाव दिलेच कसे तसेच हा प्रकार खुशामतीचा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
नव्याने विकसित झालेल्या खाम नदीपात्रात नुकतेच आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांच्या हस्ते आदित्य सरोवरचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या सरोवराबरोबरच या ठिकाणी अंबादास फुलपाखरू उद्यान, चंद्रकांत योगा लॉन्स, आदित्य सरोवर या प्रकल्पांचे ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र या दिलेल्या नावांवरून शहरात मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरु आहे. आता माजी महापौर विजया रहाटकर यांनीही हा खुशामतीचा प्रकार अयोग्य असल्याची टीका पांडेय यांच्यावर केली आहे. आपले नाव रद्द करण्याची सूचना देणारे पत्र त्यांनी प्रशासकांना पाठवले आहे.
रहाटकर यांनी पत्रात म्हटले आहे की, माझी परवानगी न घेता उद्यानातील तलावाला माजी महापौर म्हणून माझे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही नव्हते. महापुरुषांचा, मान्यवरांचा शहरात दुष्काळ नाही. तरीही राजकीय नेत्यांची नावे देण्यात आली. याला स्पष्ट भाषेत राजकारण्यांची खुशामत करणे म्हणतात. यापूर्वी आमदार अतुल सावे(Atul Save), खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांनी प्रशासक पांडेय यांना पत्र पाठवून आमची नावे रद्द करून महापुरुषांची नावे द्यावीत, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात मनपा आयुक्त अास्तिक कुमार पांडेय काय पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
