मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाची नवनिर्मिती होत आहे. रिषभ पंत , शुभमान गिल अंडी पृथ्वी शॉ सारखे तरुण खेळाडू संघाला नवीन स्तरावर नेत आहे. त्यांच्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा इतर देशातील खेळाडू सुद्धा करताना दिसतात. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने २२ वर्षीय पृथ्वी शॉला दुसरे सेहवाग म्हटले आहे.
पृथ्वी शॉने भारतीय संघात पर्दापण केल्यानंतर सुरुवातीला चांगली कामगिरी केली. मात्र मागील काही महिन्यांपासून तो खराब परफॉरमन्स देत असल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. याबाबत बोलताना क्लार्क म्हणाला ” “पृथ्वी सेहवागसारखा जबरदस्त खेळाडू आहे. सेहवाग सुद्धा एक प्रतिभाशाली खेळाडू होता, ज्याने खेळाला पुढे नेले आहे. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी, मला क्रिकेटचा तो ब्रँड आवडतो जिथे आक्रमक फलंदाज असतात. त्यामुळेच सेहवाग माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक होता. खेळाडू. मला वाटते भारताने पृथ्वी शॉवर विश्वास ठेवायला हवे. तो तरुण आहे.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पृथ्वीला टीकांचा सामना करावा लागला होता. यावेळी क्लार्कने त्याचे समर्थन केले आहे. तो म्हणाला ” पृथ्वीकडून खूप अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. त्याला अजून थोडा वेळ द्यायला हवा होता. ऑस्ट्रेलियात त्याची ही पहिलीच संधी होती. तो कसा खेळतो हे पाहण्यासाठी तुम्ही त्याला प्रत्येक संधी देऊ इच्छिता , पण दुर्दैवाने, अॅडलेडमधील त्या कसोटी सामन्यात तो खेळू शकला नाही. त्याचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा होता. आणि तो भविष्यात चांगला खेळेल यात मला काही सुद्धा शंका नाहीये” ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दौऱ्यातील अॅडलेड कसोटीत शॉला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली होती. मात्र पहिल्या डावात एकही धाव करता आली नव्हती. स्टार्कने त्याला बाद केले होते . तर दुसऱ्या डावात तो केवळ ४ धावा करून पॅट कमिन्सनच्या बॉलवर बाद झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…”,पडळकरांचे ट्वीट ठरतेय चर्चेचा विषय
- “…कुछ मिला क्या?”, संजय राऊतांनी साधला विरोधकांवर निशाणा
- “शिखरला ७.५ करोड पेक्षा कमीत निवडले गेले तर आश्चर्य होईल” माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य
- नितेश राणेंच्या अटकेनंतरचा ‘तो’ फोटो व्हायरल, जाणून घ्या काय आहे या फोटो मागचे सत्य
- “विरोधी पक्षाने त्याचे भांडवल करायचे ठरवले असेल तर..”, परमबीर सिंहांच्या आरोपानंतर राऊतांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

