पुणे: पुणे महानगरपालिकेने नुकताच २०२२ च्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नवीन प्रभाग रचना आणि त्याचे नवीन नकाशे नुकतेच जाहीर केले आहेत. पुणे महानगरपालिकेचे प्रभाग ठरवताना नेहमीच महाराष्ट्र राज्यात सत्तेवर असणाऱ्या पक्षांचा प्रभाव दिसून येतो. २०१४ मध्ये राज्यात सत्तेत आल्यावर भारतीय जनता पक्षाने आपल्याला अनुकूल ठरेल अश्या प्रकारे २०१७ च्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना केली.
२०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये एका प्रभागातून ४ नगरसेवक पुणेकरांना निवडून द्यायचे होते. अनुकूल प्रभाग रचना केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने प्रथमतःच पुणे महानगरपालिकेत सत्ता काबीज केली. भारतीय जनता पक्षाचे २०१७ मध्ये तब्बल ९९ नगरसेवक निवडून आले. तशीच काही अनुकूलता या वर्षी राष्ट्रवादी काँगेसला होताना दिसत आहे. दिनांक १ फेब्रुवारी २०२२ मंगळवारी रोजी पुणे महानगरपालिकेने नवीन प्रभाग रचना जाहीर करताच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे.
पुणे शहरात किंवा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ८ विधानसभा मतदार संघ येतात. त्यापैकी हडपसर, खडकवासला आणि वडगावशेरी या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य आहे. तर कसबा, पर्वती, कोथरूड आणि शिवाजीनगर मतदार संघात भाजपच प्राबल्य आहे. कोथरूड, पर्वती आणि कसबा मतदार संघातील अनेक प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्याला अनुकूल असे बनवले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षातील प्रमुख नेत्यांच्या पोटात गोळा यायला सुरुवात झाली आहे.
पुण्याचे विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोथरूड मधला प्रभाग देखील बदलून त्यांच्यासमोर दीपक मानकर, बाबुराव चांदोरे इत्यादी मात्तबरांचे आव्हान कसे उभे राहील याची पूर्ण पणे खात्री करण्यात आली आहे. पर्वती विधानसभा मतदार संघात देखील धीरज घाटे, करण मिसाळ या भाजपच्या मोठ्या नेत्यांसमोर इतर पक्षातील किंवा भाजपच्याच इतर नेत्यांचे तगडे आव्हान कसे उभे राहील याची सोया केली गेली आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून इतर प्रमुख पक्षातील मोठ्या नेत्यांच्या पोटात गोळा यायला सुरुवात झाली आहे असे म्हणावयास हरकत नाही . या पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे आव्हान मात्र कुठेच दिसून येत नाही.
- महत्वाच्या बातम्या :
- SSC-HSC Board Exams: दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार ; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाचा निर्णय
- शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित शिवजयंती साजरी करू-विनोद पाटील
- “ पृथ्वी शॉ तर दुसरा सेहवाग ”; ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे वक्तव्य
- Ramesh Deo: माधुरी दीक्षित, महेश मांजरेकरसह सेलिब्रिटींनी दिला आठवणींना उजाळा, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली
- “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…”,पडळकरांचे ट्वीट ठरतेय चर्चेचा विषय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

