🕒 1 min read
सांगली : सर्व खासगी शाळांच्या शिक्षकांना सरकार पगार देईल. तुम्ही फी कमी करा, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केले. शिक्षणमंत्र्यांचे शिक्षणाबाबतचे धोरण नेमके काय आहे ते त्यांनी जाहीर करावे असे आवाहन सुप्रिया सुळेंनी केले. त्यांनी जर सर्वांचे पगार दिले तर आम्ही स्वतः त्यांचे अभिनंदन करु असंही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांच्या पगाराच्या या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहेत. “इतका मोठा मंत्री जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांनी त्याबाबत निधी तयार ठेवला असेल. निधी तयार ठेवल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची? शक्य-अशक्य ही गोष्ट मंत्र्यांनी बघायची आहे, कारण वक्तव्य त्यांनी केल आहे”, असा चिमटा सुप्रिया सुळे यांनी यावेळी काढला.
भाषण करताना विचार करूनच बोला-
एक मंत्री जेव्हा बोलतो तेव्हा त्याला लाईटली घ्यायचं नसतं. चेष्टेवारी न्यायचं नाही आणि चेष्टाही करायची नाही. गंमत-जमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही. ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. तुम्ही भाषण करताना विचार करूनच बोला”, अशा खोचक शब्दांत सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारले आहे.
तुम्ही निधी तयार ठेवला आहे का?-
जर उच्च तंत्रशिक्षण मंत्री (minister of higher and technical education) म्हणत असतील की सर्व खासगी कॉलेजच्या प्राध्यपकांचे पगार आम्ही करणार तर तुम्ही निधी तयार ठेवला आहे का? तुम्ही अर्थमंत्र्यांशी चर्चा केली आहे का? असे सवाल सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केले.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane | “उद्धव ठाकरे बोगस माणूस, बाळासाहेबांची सेना रसातळाला नेली” ; भाजप नेत्याची टीका
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा मास्टर माईंड ‘टाईम मॅनेजमेंट’, उद्धव ठाकरेंना ‘असा’ देणार शह
- Jawa 42 Bobber New Launch | जावा (Jawa) ची 42 Bobber लाँच, काय आहे या बाईकची खासियत जाणून घ्या!
- Supriya Sule | “ईडी सरकारने राज्याची थट्टा चालवलीय” ; सुप्रिया सुळेंची खोचक टीका
- Amol Mitkari | “भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात…”, अमोल मिटकरींनी केली छगन भुजबळांची पाठराखन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
