🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या देवी सरस्वतीवरुन केलेल्या वक्तव्याने चांगली खळबळ उडवली आहे. तरीसुद्धा आपण बोलेलं काही चुकीचं नसल्याची भूमिका भुजबळांची आहे. अशातच राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी छगन भुजबळ यांची पाठराखण केली आहे.
अमोल मिटकरी यांनी केली पाठराखण :
भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेतेय त्यांना “सावित्री” कळलीच नाही. नथुरामी समर्थकाना आम्हीं उरून पुरू. आपल्याला सलाम. आमची माता “सावित्रीच”, असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं आहे.
पाहा ट्विट :
भुजबळ साहेब आपण महात्मा फुलेंचे खरे वारसदार शोभलात. आपल्या सत्य विधानावर जी धर्मांध मंडळी तोंडसुख घेतेय त्यांना "सावित्री" कळलीच नाही. नथुरामी समर्थकाना आम्हीं उरून पुरू. आपल्याला सलाम. आमची माता "सावित्रीच"@ChhaganCBhujbal
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 1, 2022
दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणी भुजबळांनी केली होती.
छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल :
दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर केल्यामुळे भुजबळांनी एका व्यक्तीला धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भुजबळांनी व्यक्तीला धमकी दिल्या प्रकरणी त्यांच्यासह आणखीन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत 378 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amol Kolhe | … म्हणून अमोल कोल्हेंनी घेतली अमित शहांची भेट, चर्चांना उधाण
- Job Alert | सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती
- Sushma Andhare | “सत्तांतर नंतर महाराष्ट्र कसं शांतमय झालं…”, सुषमा अंधारे यांचा राज्य सरकारला टोला
- Supriya Sule | जे.पी. नड्डा यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांचा पलटवार, म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
