Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा मास्टर माईंड ‘टाईम मॅनेजमेंट’, उद्धव ठाकरेंना ‘असा’ देणार शह

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत शिवसेना (Shivsena) पक्षावर दावा केला, त्यामुळे शिवसेना पक्षामध्ये दोन गट पडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आणि एकनाथ शिंदे गट. अशातच शिवसेनाची परंपरा असलेल्या दसरा मेळावा यावरुन चांगलंच राजकरण तापलं आहे. एवढंच नाही तर हे प्रकरण कोर्टात देखील गेलं. मात्र एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क न मिळाल्याने त्यांनी वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर त्यांच्या दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. मात्र यावेळी शिंदे गटाकडून मास्टर माईंड टाईम मॅनेजमेंट करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे गटाची योजना :

कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला असून त्यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. यावेळी रात्री सुमारे ८च्या दरम्यान त्यांचं भाषण सुरु होईल आणि ९च्या आसपास ते संपेल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रात्री ९ वाजता भाषण करावं, अशी योजना शिंदे गटाची आहे. असं झाल्यास शिंदे यांना ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे खोडण्याची संधी मिळू शकते.

दसरा मेळावा (Dussehra Melava) संपला म्हणजे दोन गटातील वाद संपतील असं नाही. एकनाथ शिंदेंनी पक्षावर तसेच चिन्हावर दावा केल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु होती. यामध्ये एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला असून पुढील निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. मात्र, हा निर्णय दिवाळी नंतर होणार असल्याचं समोर आलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी केली होती ‘ही’ मागणी :

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सप्रीम कोर्टाकडे निवडणूक आयोगाला निर्णय देण्याची परवानगी न मिळण्यासाठी मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय काय लागणार आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!